चांदवड बद्दल - About Chandwad

Image
चांदवड जिल्हा : नाशिक  पिनकोड : ४२३१०१ STD कोड : ०२५५६ लोकसंख्या  : २५३४१ (२०११ जनगणना ) वाहन आणि RTO कोड : MH15 , MH41 आमदार : Dr. राहुल आहेर (चांदवड - देवळा मतदारसंघ २०१९) खासदार : भारतीताई पवार (दिंडोरी लोकसभा मतदारसंघ २०१९) चांदवड मधील किल्ले  चांदवड किल्ला (Chandwad Fort) राजदेहेर किल्ला (Rajdeher Fort / Rajdher Fort) इंद्राई किल्ला (Indrayi Fort) धोडप किल्ला (Dhodap Fort)

धोडप किल्ला ( Dhodap Fort)



       धोडप किल्ला हा महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये दुसरा सर्वात उंच किल्ला आहे. (प्रथम - साल्हेर - १५६६ मी. (५१४१ फूट))
धोडप किल्ला हा १४५१ मी. (४७६० फूट) उंची असलेला हा पेशवाई किल्ला ९४५ हेक्टर परिसरात कळवण, चांदवड आणि दिंडोरी अशा तीन तालुक्यांच्या परिक्षेत्रात पसरलेला आहे.


या किल्ल्यावर सोनारवाडी, अलंग आणि गोवळवाडी अशा तीन आदिवासी वस्त्या आहेत. आदिवासी आणि परदेशी समाजाची कुटुंबे अजूनही किल्ल्यावर राहून दुधाचा व्यवसाय करून गुजराण करीत आहेत.


धोडप किल्ला चांदवड पासून उत्तर पश्चिमेला सुमारे २८ किलोमीटर वर आहे. 
किल्ल्यावर चांदवड - वडाळीभोई - धोडंबा - हट्टी 
या मार्गाने जावे लागते.
हट्टी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गांव.
पायथ्याला वनविभागामार्फत 'निसर्ग पर्यटन केंद्र धोडप'
(Dhodap Adventure park, Hatti) ची निर्मिती करण्यात आली आहे.

हा किल्ला म्हणजेच चांदवड रांगेतील सर्वात उंच व महत्वाचा डोंगर आहे. धोडप हा शिवलिंगासारखा दिसणारा एक ऐतिहासिक किल्ला आहे.

किल्ल्याचा इतिहास:-

हा 'धोडपावनकी' नावाचा किल्ला बर्बन निजामशाह च्या ताब्यातील किल्यांपैकी असावा.
ब्रिटीशयाचा उल्लेख 'धरप' असा करीत. हा किल्ला १६३५ मध्ये मुगल सरदार अल्लाह दी बनला स्वाधीन झालेला होता.
मुस्लिम राजां नंतर मराठयांच्या हाती हा किल्ला आल्यावर त्यांनी या किल्ल्याला नाशिकच्या महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक बनवले.
धोडपच्या जीवनातील एक महत्त्वाची घटना म्हणजे, या गडाच्या पायथ्याशी माधवराव पेशव्यांनी राघोबाबदादाचा पराभव केला. भोसले, गायकवाड व इंग्रज यांची मदत घेऊन राघोबादादा बंड करणार असे दिसू लागताच माधवरावाने राघोबाला भोसले व मोगल यांची मदत मिळण्याआधी त्याचा बिमोड करायचे ठरविले. एकंदर ४० हजार फौज घेऊन माधवराव निघाला. राघोबादादा आनंदवल्लीहून तळ हलवून धोडपच्या आश्रयाला आला. राघोबा दादाकडे २५ हजार सैन्य होते. राघोबाची फौज किल्ल्याखाली उभी राहिली. राघोबाधोडप धोडप किल्ल्यात गेला. उभयपक्षी मोठी लढाई जुंपून राघोबाच्या सैन्याचा पाडाव झाला. माधवरावांच्या सैन्याने माचीपर्यंत लूट केली. खजिन्याचा उंट लुटला, किल्ल्याला वेढा दिला, शेवटी राघोबादादा माधवरावांच्या स्वाधीन झाला. त्याला शनिवारवाडयात (पुणे) बंदोबस्तात ठेवण्यात आले.

पेशव्यांच्या अखत्यारीतील दोन सुभेदार आप्पाजी हरी आणि बाजीराव आप्पाजी यांना सोळाशे सैन्यासह या किल्यावर थांबण्यास सांगितले त्यावेळी होळकरांकडील दोन सरदार अजबसिंग व सुजकुम यानी हल्ला करुन किल्ला ताब्यात घेतला, गावात लुट केली. गाव जाळले. त्यानंतर तेथे कधी भरभराटी पुन्हा आली नाही. पुन्हा पेशव्यांच्या ताब्यात हा किल्ला आल्यानंतर पेशव्यांच्या अधिकाऱ्यांनी १८१८ मध्ये कोणत्याही तंट्याशिवाय हा किल्ला सोडून दिला.

१८१८ मध्ये पेशव्यांनी ताबा सोडल्यानंतर धोडपला कॅप्टन ब्रिगसने भेट दिली. त्याने या किल्ल्याचे वर्णन "खडकाळ स्वरुपातला मोठा डोंगर , जो चांदोर (चांदवड) रांगेतील मजबूत बांधणीचा किल्ला आहे".
असे केले आहे."

धोडपच्या डोंगरात उगम पावणाऱ्या नद्या म्हणजे नेत्रावती व कोलथी या होय.
Dhodap fort top

किल्ल्याची चढण व जाण्याचा मार्ग:-

या किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्यत: दोन मार्ग आहेत. एक वडाळीभाई व दुसरा कळवणमार्गे, बडाळीभोईमार्गे गेल्यास किल्ल्याच्या पायथ्याशी राजपूत लोकांची वस्ती असलेले हट्टी हे छोटेसे गाव आहे. कळवण किंवा देवळामागे गेल्यास हनुमंतपाडा हे आदिवासी लोकवस्ती असलेले गाव लागते. धोडपच्या पायथ्याशी हट्टी गावापासून माची धोडप गावापर्यंत चढण्यास जवळजवळ एक ते दीड तास लागतो. माचीपासून किल्ल्यावरील सप्तशृंगी देवीच्या कुपा पर्यंत जाण्यास जिथे डोंगराची चढण सुरू होते तिथे मारुतीची स्थापना केलेली आहे. मारुतीपासून मारचीपरयंत पाऊलवाटेने वळणावळणाने चढत जावे लागते.
थोडे पुढे गेल्यानंतर तीन वाटा फुटलेल्या दिसतात, उजवीकडील वाट माचीवरील सोनाराच्या वस्तीकडे जाते डावीकडील वाट पेशवेकालीन गणपती व शंकराध्या मंदिराकडे तर समोरचीवाट किल्ल्याकडे जाते. या ठिकाणी एक जुनी पायन्यांची बारव (पायविहीर) आहे. या बारवेची बांधणी संपूर्ण दगडात चौकोन आकाराची असून पाण्यात उतरताना खालील कमानीची रचना मंत्रमुग्ध करून टाकते. उजवीकडच्या वाटेवरमाची धोडपलगत आठ ते दहा घरांची वस्ती आहे. पूर्वी पेशवेकाळात या माचीवर बरीच मोठी वस्ती असावी, असे येथे असलेल्या भग्नावस्थेतील व जीर्णावस्थेतील विखुरलेल्या पडक्या घरांवरून दिसते.
माचीतून पश्चिमकडे जाणाऱ्या वाटेवर प्रथम गणपती मंदिर व एक शंकराचे मंदिर लागते. या शंकराच्या मंदिराजवळ एक पायविहीर आहे. जवळच दोन पाण्याचे कुंड आहेत. तेथून गेल्यानंतर आपण गडाच्या पश्चिम वेशीजवळ पोहोचतो, या वेशीच्या कमानी, दरवाजा आजही सुस्थितीत आहे. या वेशीबाहेरच काही लोक वस्ती करून राहतात, त्याला गवळीपाडा असे म्हणतात. 
गडाचा मुख्य दरवाजा गुप्त ठिकाणी दडवलेला असल्याने कुठूनही दिसत नाही. तिथे पोहोचल्यावर एक पाण्याचे मोठे टाके नजरेस पडते. या पाण्याच्या टाक्याच्या वरच्या बाजूस खोदलेला जिना लागतो. जिन्याच्या शेवटी एक वळण घेताच एक दरवाजा लागतो. वरच्या सपाटीवर आल्याने तर उजव्या बाजूला हवालदाराचा पडका वाडा दिसतो. त्याला सदर असे म्हणतात. डाव्या बाजूला थोडे चालुन गेल्यास पाण्याचे दोन मोठे टाके दिसतात. शेवटी एक मोठी गुफा लागते. या गुफेत सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे या मंदिराजवळ असलेल्या टाक्यातील थंडगार पाणी प्यायल्याने गड चढल्याचा थकवा नष्ट होतो. सप्तशृंगी देवीच्या गुफेपासून थोडे पुढे चालून गेल्यानंतर आपण धोडप किल्ल्याच्या प्रसिद्ध अशा भिंतीवर जाऊन पोहोचतो. या भिंतीचा आकार अतिशय अरुंद पण लांबलचक असा आहे, तर माथा धारदार सुर्याने कापल्यासारखा सपाट आहे. भिंतीचे उभे कडे सुमारे ३०० मीटर उंच आहेत. भिंतीच्या मध्यावर यू आकाराचे खंडार पडलेले दिसते.
ही जागा समुद्रसपाटीपासून ५०५७.५ फूट उंच असून धोडपचा पिंडीसारखा दिसणा सुळका ५२५ फूट उंच आहे. येथे जाण्यासाठी प्रस्तारोपण करावे लागते.




Popular posts from this blog

रेणुका देवी चांदवड (Renuka Mata Mandir)

इच्छापूर्ती गणेश मंदिर / गणेशबारितील गणपती /बारीतील गणपती (Ichchhapurti Ganesh temple)

चंद्रेश्वर महादेव मंदिर (Chandreshwar Chandwad)