निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या चांदवडची ओळख श्री रेणुकादेवी मंदिर या एतिहासिक वास्तू शिवाय अपूर्णच आहे,चांदवड शहराच्या उत्तरेला मुंबई-आग्रा महामार्गावर १ ते १.५ किमी वर तांबकडा डोंगराच्या कुशीत गुहा सद्रृश भागात रेणुका आईचे आकर्षक असे मंदिर आहे.मंदिराच्या कळसाला लागूनच जुना मुंबई-आग्रा महामार्ग जात होता आता मंदिराचा आणि भाविकांचा विचार करूनच नवीन महामार्ग डोंगर खोदून तयार केला आहे. इसवी सन १७४० च्या आसपास महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे समजते.शहराकडून मंदिराकडे जाताना महामार्गालगत एक छोटासा रस्ता लागतो त्या रस्त्याने मंदिराला जाण्यासाठी जुन्या दगडी पायर्या आहेत,त्या पायर्या चढून गेल्यावर मंदिराचे भव्य असे दगडी प्रवेशद्वार आहे. महामार्गावरून दिसणारे हे दगडी भव्य प्रवेशद्वार म्हणजेच चांदवडच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष आहे.पावसात तर प्रवेशद्वारातून आणि दगडी पायऱ्यांवरून खाली खळखळणारे पाणी मन मोहवून टाकते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर प्रशस्त पटांगण आणि भव्य मंदिर समोर दिसते.पटांगणात उंचच उंच अशा दोन भव्य दगडी दीपमाळा आपल्या स्वागतासाठी तयार असतात.मंदिराचे आवार खुप छान सुशोभित केले आहे.तिथुनच चंद्रेश्वर गडावरी चंद्रेश्वर महादेवांचे सुंदर मंदिर दिसते. प्रवेशद्वारा लागुनच एका बाजूला नव्याने दोन भक्त निवास बांधलेले आहेत आणि दुसर्या बाजूला दुकानां साठी व्यवस्था आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर चारी बाजूंनी दगडी बांधकाम केलेल्या धर्मशाळा बांधल्या आहेत.मंदिराच्या छतावर कोरलेल्या चार-पाच शिलालेखांवरून असे वाटते की या धर्मशाळा १७७२ मध्ये बांधलेल्या असाव्यात.धर्मशाळांच्यामध्ये आणि गाभाऱ्याच्या अगदी समोरच त्रिशूळ आणि तुळशी वृंदावन आहे.गाभार्याच्या पूर्वेस पडवीत नंदी, महादेवाची पिंड, संगमरवरी छोटी देवी, पादुका, मारुती व माय देवीचा भव्य मुखवटा आहे.देवीचा मुख्य गाभारा तांबकडा कोरून बनवलेला आहे.
चांदवड करांच्या अभिमानात भर घालणारी एक गोष्ट ती म्हणजे नवरात्रातील नऊ दिवस असणारी देवीची मोठी यात्रा. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा भावीक धुळे ,जळगाव ,नाशिक जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांमधून सुद्धा मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत असतात .नवरात्रात नऊ दिवस येथे घटस्थापना केली जाते. यात्रेत प्रचंड गर्दी असते, मिठाईची दुकाने खेळणी वगैरे दुकाने असून सुद्धा यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे रहाट पाळणे वगैरे इत्यादी असतात.रात्रीच्या वेळी होणाऱ्या रोषणाई मुळे यात्रा अधिकच खुलून दिसते.अनेक भाविक दुर दुरुन नवस फेडण्यासाठी येत असतात.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी यासुद्धा रेणुकादेवीच्या प्रमुख उपासक होत्या रेणुका देवीच्या दर्शनासाठी अहिल्यादेवी भुयारी मार्गाने जात असे.आजही रंग महालातून देवी मंदिरापर्यंत जाण्यासाठी भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते.परंतु सुरक्षेच्या दृष्टीने हे आता बंद केलेले आहे.देवीच्या मंदिरात जेथें ठेवलेला आहे त्याखाली हा भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते.देवीच्या मंदिरात जेथें ठेवलेला आहे त्याखाली हा भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते.त्या पालखीमधून रंग महालात असलेला देवीचा सोन्याचा मुखवटा इतर अनेक सोन्या-चांदीचे ,मोत्यांचे अलंकार व महावस्त्र मिरवुन देवीला नेले जातात व परत आणून रंग महालात ठेवले जातात.तसेच दसऱ्याच्या दिवशी रेणुका देवीची पालखी सीमोल्लंघनासाठी गावाबाहेर असलेल्या खंडेराव मंदिरात नेले जाते.ही सर्व व्यवस्था ,रंगमहाल व मंदिराची देखभाल होळकर ट्रस्टतर्फे केली जाते.
जागृत असलेल्या रेणुका देवीचे रूप दिवसातून तीन वेळा बदललेले स्पष्टपणे दिसून येते प्रात:काळी बाला , मध्यांन्ही युवा आणि सायंकाळी वृध्दा अशी दिवसातली तीन रूपे देवीचा मुखवट्या वर स्पष्ट दिसतात, अशा उत्कृष्ट मूर्तींचे सौंदर्य बघण्यासाठी एकवेळ अवश्य भेट द्या ह्या चांदवड नगरीला.
|| कुलस्वामिनी रेणुका माता कि जय ||
Comments
Post a Comment