चांदवड बद्दल - About Chandwad

Image
चांदवड जिल्हा : नाशिक  पिनकोड : ४२३१०१ STD कोड : ०२५५६ लोकसंख्या  : २५३४१ (२०११ जनगणना ) वाहन आणि RTO कोड : MH15 , MH41 आमदार : Dr. राहुल आहेर (चांदवड - देवळा मतदारसंघ २०१९) खासदार : भारतीताई पवार (दिंडोरी लोकसभा मतदारसंघ २०१९) चांदवड मधील किल्ले  चांदवड किल्ला (Chandwad Fort) राजदेहेर किल्ला (Rajdeher Fort / Rajdher Fort) इंद्राई किल्ला (Indrayi Fort) धोडप किल्ला (Dhodap Fort)

धोडप अ‍ॅडव्हेंचर पार्क (Dhodap Adventure park)

dhodap adventure park

चांदवड तालुक्यातील हट्टी गावातील गावकर्यांच्या व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या साहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या नाशिक पूर्व वनविभागाने ग्रामविकास, जिल्हा नियोजन विकास व बिगर आदिवासी
योजनेअंतर्गत २०१५ सालापासून निसर्ग पर्यटन व साहसी क्रीडा पार्कचा प्रकल्प हाती घेतला. वर्षभरात हा प्रकल्प पूर्णत्वास आला. 
या ठिकाणी पर्यटकांसाठी प्राथमिक सुविधांसह साहसी क्रीडा प्रकार (AdventurePark) उपलब्ध करून देण्यात आले आहे. येथे क्लायम्बिंग वॉल, बर्मा ब्रीज, फ्लाइंग फॉक्स लाइन, झिप लाइन, वॉल बॅरियर, बॅरेल क्रॉसिंग, चिंपाजी स्विंग, आइसलैंड हुपर, झुमरिंग, कमांडो नेट, हॉरिजेन्टल लॅडर्स, टार्झन स्विंग, टायर क्रॉसिंग, टायर ब्रीज, टायर वॉल, साईडवे स्विंग, झीग-झॅक स्विंग हूपर, रनिंग ट्रॅक, हॉरिजेन्टल स्विंग यासारख्या साहसी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.राज्य शासनाच्या निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या धोरणांतर्गत वन विभागाकडून जिल्ह्यातील विविध गावांमध्ये इको टुरिझम संकल्पना राबविली जात असून, या माध्यमातून स्थानिकांना रोजगार व वनसंवर्धनाला चालना दिली जात आहे.
दुर्ग, गड, किल्ले, वन्यजीव, निसर्गाची जैवविविधता माहिती व्हावी, यासाठी वनविभागाने शासनाच्या मार्गदर्शनानुसार "इको, टुरिझम संकल्पनेच्या वाटेवर दमदार पाऊल ठेयले आहे. याचा प्रत्यय हट्टी येथील निसर्ग पर्यटन केंद्राला दिलेल्या भेटीत येतो. हट्टीच्या गावकर्यांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाया आणि गावाचा विकास साधला जावा, तसेच गावाच्या परिघामध्ये असलेल्या धनसंपदेचे संरक्षण व्हावे, या मुख्य   उद्देशाने वनविभागाने सुमारे दोन कोटी ३२ लाख रुपये खर्चून सात एकर पसिररात निसर्ग पर्यटन केंद्राची उभारणी केली. यामध्ये पर्यटकांना धोडप किल्ल्याबरोबर अतिशय कमी दरात या निसर्ग पर्यटन केंद्राचा आनंद घेता येणार आहे. यासाठी याठिकाणी पर्यटकांच्या दृष्टीने सर्व सुविधा मिळाव्यात म्हणून निसर्ग निर्वाचन केंद्र, उपहारगृह, ४० लोक राहू शकतील अशी निवास व्यवस्था, वनतळे, पॅगोडा, तंबू, साहसी क्रीडा पर्यटन, विद्यार्थी यांच्यासाठी 'ॲडवेंचर थीम पार्क' तयार करण्यात आले आहे. यामध्ये २१ साहसी प्रकारचे खेळ आहेत. इतर पर्यटन स्थळांच्या दृष्टीने अत्यंत माफक आणि सर्वांना परवडेल असे हे निसर्ग केंद्र आहे.

 निसर्ग पर्यटन केंद्रातील निसर्ग निर्वाचन केंद्र (धोडप संग्रहालय) पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. या ठिकाणी घोडप किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्यात आली असून, यामध्ये या किल्ल्याचा इतिहास, प्राणी, पक्षी, वनस्पती यांची माहिती आढळते.

चांदवड तालुक्यातील या पर्यटन केंद्रामुळे हट्टी गावाला व धोडप किल्ल्याला नवीन ओळख मिळाली असून, नाशिककरांसह साहसीवीर, गियारोहक, कौटुंबिक सहल, विद्यार्थी, पर्यावरण व साहसी खेळाची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी हट्टी पंढरीच ठरणार आहे.

जाण्याचा मार्ग (How to reach to Dhodap ):-

चांदवडहुन (नाशिककडे) मुंबई-आग्रा महामार्गावर  वडाळीभाई गाव १५ कि.मी.
वडाळीभोईपासून धोडंबा गाव ८ कि.मी., धोडंबा ते हट्टी ५ कि.मी. 
एकूण सरासरी २७-२८ किलोमीटरच्या अंतरावर धोडपच्या पायथ्याशी साकारलेले निसर्ग पर्यटन केंद्र आहे. गावामधून जाणारा रस्ता खराब असला तरी दुचाकी व चारचाकी वाहनाने तेथे सहज जाता येते.

तर मग कधी येताय हे साहसी क्रीडा प्रकार अनुभवायला........?

Comments

Popular posts from this blog

रेणुका देवी चांदवड (Renuka Mata Mandir)

इच्छापूर्ती गणेश मंदिर / गणेशबारितील गणपती /बारीतील गणपती (Ichchhapurti Ganesh temple)

धोडप किल्ला ( Dhodap Fort)