'शनी महात्म्य ऐकत असताना उज्जैनी चा राजा विक्रमादित्य थट्टा करू लागला, काही काळानंतर राजाला साडेसाती सुरू झाली.
एकदा शनिदेव उज्जैन नगरीत घोडे विकण्यासाठी व्यापाऱ्याचा वेशात आले, राजाला घोडे फिरून पहा मग मोल कळेल, असे सांगितले.
राजा घोड्यावर बसताच घोडा उड्डाण करून वर्दडी येथील अरण्यात डोंगरदरीत सोडून गेला. राजा बराच काळ त्या परिसरात राहिला.
पुढे ते तामकेेेढा (चांदवड) नगरीत आला. येथे राजावर चोरीचा आळ आला व शिक्षा म्हणून त्याचे हात-पाय तोडून राजास टाकून देण्यात
आले. अशा अवस्थेत तो तेलाच्या घाण्यावर काम करीत असे. बरेच वर्ष लोटले, एके दिवशी रात्रीच्या वेळी राजा 'दीपराग' गाऊ लागला,
त्यावेळी चांदवड गावातील सर्व दिवे लागले गेले चांदवड चा राजा चंद्रसेन त्याची मुलगी चंद्रहास्य हीचा पण होता की, 'जो कोणी दीपराग
गाऊन दिवे लावेल त्याच्याशीच विवाह करेल' असे झालेले पाहून त्या व्यक्तीस शोधण्यात आले पण राजा विक्रमादित्याचे हात-पाय
तोडलेेेले होते. तरीदेखील राजकुमारी लग्नासाठी तयार झाली. विक्रमादित्यची साडेसाती देखील संपत आली होती. शनिदेव प्रकट होऊन
राजाचे शरीर पूर्ववत केले. व वर मागावयास सांगितले, राजाने 'अशी प्रकारची साडेसाती कोणासही देऊ नकोस' असे मागितले.
राजा विक्रमादित्य व राजकुमारी चंद्रहास्य यांचा विवाह थाटामाटात तामकडा परिसरात (सध्याची चंद्रेश्वर मंदिर) पार पडला व राजा
सपत्नी परत उज्जैन नगरी ला गेले.'
आजही याची साक्ष देणाऱ्या घोड्याच्या टापा येथे दिसतात.
राजा विक्रमादित्य चा प्रतीकात्मक पुतळा येथे उभारला आहे.
मंदिर परिसरात शनी देव मंदिर, मारुती मंदिर, बालाजी मंदिर तसेच
मंदिर लगतच्या पायऱ्या उतरून गेल्यावर नवीन तयार केलेले शनी मंदिर
पहावयास मिळते.
त्याच प्रमाणे पर्यटन विकासाच्या दृष्टीने विविध विकास कामे शासनामार्फत करण्यात
आलेली आहेत. येथील विविध प्रकारच्या पाळण्यांचा आपण आनंद घेऊ शकतात.
मंदिरात शनि अमावस्या, शनि जयंती व शनिवारी भाविकांची मोठी गर्दी असते.
हा एक चांगला टुरिस्ट स्पॉट व पिकनिक स्पाॅट बनत चालला आहे.
Comments
Post a Comment