राजदेहेर किल्ला (Rajdeher Fort)

         
Rajdeher fort

         अजिंठा - सातमाळा रांगेत स.स. पासुन 1344 Meter. उंच, कातळकोरीव, कमनीय सदर, दुर्जेय स्थान, विस्तृत पठार, नयनरम्य निसर्गसौंदर्य अर्थात किल्ले राजदेहेर.

            इतर अनेक किल्ल्यांप्रमाणेच इ. स. 1818 मध्ये इंग्रजांनी राजधेरला नष्ट करण्याचा प्रयास केला. बव्हंशी खराबी झालेला, परंतु अनेक मारे सहन करून आजही दिमाखात ऊभा ठाकलाय आपल्या स्वागताला.


किल्ला बघण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला राजधेरला जाणे हवे. चांदवडपासून बस मिळेल.तेथुन पुढे प्राथमिक शाळेमागुन एक रस्ता गडाकडे जातो.पायथ्याला एक लोखंडी शिडी आहे. शिडी चढल्यावर कोरीव पायऱ्या लागतात. तेथुन गड सुरु झाला. 

      पायऱ्या संपल्यावर उजवीकडे वळावे, समोरच दोन दगडी ओटे आहेत, जुन्या वास्तुंचे भग्नावशेष. जवळच राजधेरची प्रसिद्ध सदर आपल्या स्वागताला हजर असते. कैक मसलतींची साक्षी, गतवैभव सांगणारी. 

सातवाहन (इ. स. 217-365) 
राष्ट्रकूट (इ. स. 390-685) 
यादव (इ. स. 700-1112) 
अ.खि.(इ. स. 1130-1380) 
निजाम(इ.स.1489-1570 व 1567-1636) 
मुघल (इ. स. 1636-1818) 
इंग्रजांनी 1818 साली गड बेचिराख केला. असा साहसी, बुलंद, बेबाक, इतिहास लाभलेला व तसाच दुर्लक्षित किल्ला.

सदरेवरून पुढे गेल्यास बुरूज येतो,हा उत्तर मुखी. परत सुरूवातीस येऊन डावीकडे जावे. प्रथम येते एक थडगे,मग उजवीकडे धान्यगृह, पुढे खांबकोरीव पाण्याची टाकी, इथे पहिला टप्पा झाला.

अजुन थोडे वर चढल्यावर कोरीव शिवमंदिर व तलाव आहे,हा दुसरा. तिसऱ्या टप्प्यावर भग्नावशेष. सरळ गेल्यास चौथ्या ठिकाणी तीन कोरीव टाकी असुन इंग्रजी टी (T) आकारातल्या नालीने जोडलेली आहेत. हे एक खांबकोरीव पाण्याचे टाके आहे. पाणी चवदार व थंड आहे.


परत येऊन सरळ गेल्यास माथा येतो. इथुन सह्याद्रिचा राकटपणा, रौद्रता, सौंदर्य, नजरेत भरतात,कोलधेर, इंद्राई, चंद्राई, कांचना, धोडप, साडेतीन रोडगे, रासलिंग, सह्याद्रिची लेकरे.. असा हा दुर्गम दुर्ग आपली वाट बघतोय. 


 याच याला एकदा भेटायला.
Comments

Popular posts from this blog

चांदवड (Chandwad)

अहिल्यादेवी होळकर आणि चांदवड (Ahilyadevi - Chandwad)

धोडप किल्ला ( Dhodap Fort)