चांदवड (Chandwad)

Image
चांदवड (Chandwad) शहर एक दृष्टीक्षेप            समुद्रसपाटीपासून सुमारे १००० फुट ऊंचीवर असलेले चांदवड हे शहर नाशिक पासून ६४ कि.मी. अंतरावर असून सह्याद्रीच्या रांगांच्या कुशीत व दख्खनच्या सीमेवर वसलेले आहे. हे गाव  २०.२० अंश उत्तर अक्षांश आणि ७४.१६ अंशपूर्व रेखांश  वर स्थित आहे  .

इंद्राई किल्ला Indrayi Fort (Indrayani Fort)

             
Indrayi killa

                  छन्नी-हातोड्याची कलात्मकता, कातळकोरीव सौंदर्य, सातमाळापर्वतरांगेत अवघड स्थान, स.स.पासून तब्बल 1370 Meter उंची, सातवाहन स्थापत्यकलेचा अजोड नमुना अशी नाना मानाची तुरे ज्याच्या शिरपेचात आहे असा दुर्गवीर इंद्राई किल्ला (किल्ले इंद्राई).


                किल्ला बघण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला चांदवडपासून जवळच असलेल्या वडबारे गावी जावे लागते. तेथुन नुकत्याच तयार केलेल्या एका कच्च्या रस्त्याने आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते. तेथे एका दगडी ओट्यावर हनुमानाची मूर्ती दिसते. त्याचे दर्शन घेऊन उजवीकडे वळावे. जवळच एक घर असुन त्याच्यामागोमाग जाणारा रस्ता गडाकडे जातो. सातवाहन स्थापत्यकलेचा अजोड नमुना अशी ओळख असलेल्या कातळकोरीव अशा 80-90 पायऱ्या लागतात.

           

             अतिशय रेखीव आणि सुबकपणे कोरलेल्या ह्या पायऱ्या एकप्रकारे गरजेवेळी शत्रुला कोंडीत पकडायला उपयुक्त आहेत. सुरूवातीस दोन्हीबाजूने शिपायांसाठी कातळकोरीव अशा खोबणी आहेत, जेथे बसुन पहारा देण्यास सोपे व सुरक्षित व्हावे.


               पायऱ्या संपल्यावर डावीकडे एक नऊ ओळींचा फारसी शिलालेख आहे. त्यात मोगल सरदार अलावर्दीखानाने जिंकलेल्या किल्ल्याच्या नावाचा उल्लेख आहे.


                  समोर उभा असणारा भग्नावशेषी दरवाजा आपल्या गतवैभवाची साक्ष देत उभा ठाकलाय. त्याला ओलांडुन प्रचंडता दर्शवणारा, पूर्व -पश्चिम पसरलेला माथा नजरेत भरतो. सरळ पश्चिमेस गेल्यास येणारा उंचवटा डावीकडे सोडुन उजवीकडे वळावे. समोरच काही कोरलेल्या गुहा व दालने राजधेरकडे तोंड करुन अाहेत. तेथे उजेडासाठी प्रवेशद्वारलगतचा खडक सरळ आडव्या रेषेत खोदलाय.ही दालने बघुन परत यावे. इथुन डावीकडे चालत गेल्यास येणारा दगडी चौथरा ओलांडुन आपण एका विस्तृत कातळकोरीव तलावाजवळ पोहोचतो. समोरच खांबकोरीव, कमनीय सौंदर्य लाभलेली 20दालने आपल्या स्वागताला हजर. त्याशेजारीच पुरातन शिल्पकाराच्या गुणवत्तायुक्त कामाची पावती देणारा महादेव भोलेनाथ आपल्या गर्भगृही विराजित आहे.
मंदिरात शिवलिंगाचा अभिषिक्त जलाला ओलांडण्याची गरजच भासता नये करिता वास्तुकाराने कल्पकतेने त्या जलामृताला तळ्यात वाट करुन दिली.शेजारील दालने बघुन पुढे गेल्यास भग्नावशेषी राजवाडा आणि त्याचे चौथरे बघायला मिळतात.संपूर्ण गड बघण्यासाठी 3-4 तास लागतात. 

किल्ल्याच्या इतिहास  :

गौतमीपुत्र सातकर्णी (3रे शतक)
राष्ट्रकूट राजे (396-682/85)
महाराजा चंद्रादित्य (5वे शतक)
शेऊणचंद्र प्रथम (इ.स.655-689 दरम्यान)
देवगिरी साम्राज्य (712-1110)
खिलजी (1128-1290)
क्षत्रप पुळुमावी (1292-1389)
निजाम (1403-1596) व (1601-1636)
मोगल (1636-1818)
इंग्रज 1818

असा साहसी व अवाढव्य राजवट लाभलेला कदाचित एकटा किल्ला
किल्ले इंद्राई, खराखुरा ,     "दुर्गम दुर्ग "
Comments

Popular posts from this blog

धोडप किल्ला ( Dhodap Fort)

रंगमहाल - होळकर वाडा (Rangmahal)

रेणुका देवी चांदवड (Renuka Mata Mandir)