चांदवड बद्दल - About Chandwad

Image
चांदवड जिल्हा : नाशिक  पिनकोड : ४२३१०१ STD कोड : ०२५५६ लोकसंख्या  : २५३४१ (२०११ जनगणना ) वाहन आणि RTO कोड : MH15 , MH41 आमदार : Dr. राहुल आहेर (चांदवड - देवळा मतदारसंघ २०१९) खासदार : भारतीताई पवार (दिंडोरी लोकसभा मतदारसंघ २०१९) चांदवड मधील किल्ले  चांदवड किल्ला (Chandwad Fort) राजदेहेर किल्ला (Rajdeher Fort / Rajdher Fort) इंद्राई किल्ला (Indrayi Fort) धोडप किल्ला (Dhodap Fort)

रंगमहाल - होळकर वाडा (Rangmahal)

रंगमहाल :  रंगमहालाचे वैशिष्ट्य म्हणजे हा वाडा अतिशय भव्यदिव्य, भक्कम,सुबक भुईकोट प्रकारातील आहे.कोरीव नक्षीकाम आणि काष्ठशिल्पातील अजोड व अवर्णनीय कलाकुसरीने नटलेला आहे.अशा प्रकाराची कलाकुसरीची जगात मोजकी ठिकाणे आहेत त्यापैकी रंगमहाल एक आहे.सोबतच मजबूत दरवाजा,विशाल सभागृह,उंच मनोरे,आणि खास करून त्याचा राजेशाही रुबाब. 


चांदवडचा आणि अहिल्यबाई होळकरांचा संबंध तसा जुनाच.मल्हारराव होळकरांची सून म्हणुन वाड्यातला अधिकार, आणि राज्यकर्ती स्त्री म्हणून रंगमहालाची स्वामिनी, असा दुहेरी संबंध.
मल्हाररावांनी नाशिक मुक्कामास असलेल्या भाऊसाहेब पेशव्याकडे २५००० होन रोखीने चांदवडची सरदेशमुखी खरेदी केली. ‘त्या अंतर्गत होळकरांना चांदवड परगणा तसेच चांदवडचा देशमुखी वाडा मिळाला.’(संदर्भ -१७४० मराठ्यांचा इतिहास). म्हणजे होळकरांनी चांदवडचा “रंगमहाल” बांधलेला नसून मात्र त्यात काही बदल केलेत. कदाचित येथील भित्तीचित्रे होळकरांच्या अगोदरची असतील? असो. 

        पण त्याकाळी असलेली ‘रंगमहालाची’ ओळख ऐषरामाचे ठिकाण अशी होती.होळकरांनी ती बदलून इथल्या दरबारातील भित्तिचित्रांचा मान राखत ‘रंगमहालाला’ एक कलाकेंद्र,न्यायासन, आणि राजकीय धोरणामुळे प्रसिद्ध असे एक महत्त्वपूर्ण स्थान बनवले. इथल्या दरबारातील पौराणिक भित्तीचीत्रांमुळे हा देशमुखी वाडा “रंगमहाल” झाला असेल असे तज्ञ सांगतात. 

        
        रंगमहालात अहिल्याबाई होळकरांची राजगादी,होळकरांची वंश परंपरा दाखविणारी छायाचित्रे, तत्कालीन काही शस्त्रे,तसेच अहिल्याबाई व रेणुकादेवीची प्रतिकृती वाहणारी पालखी,उपलब्ध आहेत.सध्या पुरातत्त्व विभागातर्फे रंगमहालाच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. लवकरच होळकरांचीओळख असणारा हा “रंगमहाल” मान उंचावून पुन्हा एकदा उभा ठाकतोय,येणाऱ्या पिढ्यांना होळकरांची आणि मराठ्यांची शौर्यगाथा सांगण्यासाठी. 
  
मग, काय ठरवलंय? येणारना आमच्या चांदवडला हा अद्वितीय असा रंगमहाल बघायला? नक्कीच या.





Popular posts from this blog

रेणुका देवी चांदवड (Renuka Mata Mandir)

इच्छापूर्ती गणेश मंदिर / गणेशबारितील गणपती /बारीतील गणपती (Ichchhapurti Ganesh temple)

चंद्रेश्वर महादेव मंदिर (Chandreshwar Chandwad)